दिवसाढवळ्या घर फोडले; तिघांच्या आवळल्या मुसक्या !
By राजकुमार जोंधळे | Published: December 29, 2022 05:00 PM2022-12-29T17:00:57+5:302022-12-29T17:01:17+5:30
लातुरातील घटना, चोरीतील सोन्याचे दागिने जप्त
लातूर : शहरातील जुना औसा रोड परिसरातील दिवसाढवळ्या घर फोडणाऱ्या अट्टल तिघा चोरट्यांना शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी सांगितले, २३ डिसेंबर २०२२ रोजी शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत जुना औसा रोड परिसरात एक घर फोडून, अज्ञात चोरट्यांने ५२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीबाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यानुसार शिवाजीनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांच्या पथकाने चोरट्याचा मग काढला. तपासादरम्यान पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे संवशीयीत आरोपी अक्षय राम तेलंगे (रा. गोपाळ नगर ,लातूर), प्रशांत अर्जुन शिंदे ( रा. पाखरसांगवी, लातूर) आणि प्रफुल प्रकाश पवार (रा. गिरवलकर नगर, लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या. घरफोडीबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय, चोरलेले मुद्देमाल सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले. तपास पोलीस अंमलदार शिरसाठ करत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अंगद शिरसाट, युवराज गिरी, वालचंद नागरगोजे, बालाजी कोतवाड, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांच्या पथकाने केली.