दाेन गावठी कट्ट्यासह एक अल्पवयीन मुलगा जाळ्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: March 30, 2025 20:11 IST2025-03-30T20:10:54+5:302025-03-30T20:11:11+5:30

दाेघांविराेधात गुन्हा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

A minor boy was caught with two village women. | दाेन गावठी कट्ट्यासह एक अल्पवयीन मुलगा जाळ्यात

दाेन गावठी कट्ट्यासह एक अल्पवयीन मुलगा जाळ्यात

राजकुमार जाेंधळे

लातूर : दाेन गावठी कट्ट्यासह एका १७ वर्षीय मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातुरात पकडले. त्याच्याकडून दाेन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरात गावठी कट्टा बाळगणारा एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांनापाेलिसांना दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने लातुरातील गांधी मार्केट परिसरात सापळा रचला. दरम्यान, एका संशयीत १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी करुन झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे दाेन गावठी कट्टे (पिस्टल), जिवंत काडतुसे आढळून आली. ताब्यातील मुलगा मांजरी (ता.जि. लातूर, सध्या रा. वारजे माळवाडी, पुणे) गावचा रहिवासी आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात अल्पवयीन मुलासह व्यंकटेश ऊर्फ विकी शिवशंकर अनपुरे (रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. व्यंकटेश हा गुन्हा घडल्यापासून पसार आहे. तपास गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस करीत आहेत.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजेश घाडगे, माधव बिलपटे, तुराब पठाण, नवनाथ हासबे, पाराजी पुठ्ठेवाड, युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: A minor boy was caught with two village women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.