शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Published: December 3, 2024 10:11 PM2024-12-03T22:11:58+5:302024-12-03T22:12:53+5:30

या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

A raid on a farm shed Gutkha worth 2 lakh seized one arrested Action of Anti-Terrorism Branch | शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

राजकुमार जाेंधळे, लातूर: सुगंधित तंबाखू, गुटख्याचा साठा करुन ठवेलेल्या शेडवर दहशतवादविराेधी शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी जवळपास दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाेलिसांनी खराेळा (ता. रेणापूर) शिवारात मंगळवारी केली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पाेलिसांनी सांगितले, पांढरी (ता. रेणापूर) गावातील दाेघांनी खराेळा शिवारात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती खबऱ्याने लातूर येथील दहशतवाद विराेधी शाखेच्या पथकाला दिली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने अचानकपणे शेतातील शेडवर छापा मारला.

या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी बालाजी गणपती ढाेंबरे (वय ६५ रा. पांढरी ता. रेणापूर) यास ताब्यात घेत अधिक चाैकशी केली असता, हा साठा विक्री करण्यासाठी मी आणि मुलगा नागनाथ ढाेंबरे यांनी करुन ठेवल्याची कबुली दिली. घटनास्थळाचा पथकाकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत दहशतवादविराेधी शाखेतील सहायक पाेलिस उपनिरीक्षक अंगद काेतवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रेणापूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन पाेलिस उपाधीक्षक राजश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक पाेलिस उपनिरीक्षक अंगद काेतवाड, सहायक फाैजदार जाधव, पाेलिस हवालदार शेख, गुंडरे यांच्या पथकाने केली.

Web Title: A raid on a farm shed Gutkha worth 2 lakh seized one arrested Action of Anti-Terrorism Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.