जुगार सुरु असलेल्या घरावर छापा; ११ जुगाऱ्यांना पकडले
By राजकुमार जोंधळे | Published: November 21, 2023 07:22 PM2023-11-21T19:22:58+5:302023-11-21T19:23:06+5:30
अहमदपुरातील घटना : ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त...
लातूर : अहमदपूर शहरातील एका घरात सुरु असलेल्या जुगारावर पाेलिस पथकाने मंगळवारी छापा मारुन, ११ जुगाऱ्यांना पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह राेख रक्क्म ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात जुगाऱ्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, जिल्हा पाेलिस अधीखक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविराेधात कारवाई केली जात आहे. अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अहमदपूर शहरातील एका घरात जुगार सुरु असल्याची माहिती चाकूर येथील अप्पर पाेलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने अचानकपणे घरावर छापा मारला. यावेळी तिर्रट नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याचे आढळून आले. पाेलिस पथकाने ११ जुगाऱ्यासह एकूण ६८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ जुगाऱ्यासह केला घरमालकावरही गुन्हा...
अहमदपूर शहरात एकाने आपल्या घरातच स्व:ताच्या फायद्यासाठी पैशावर जुगार चालिवत हाेता. दरम्यान, त्याच्या घरात एकूण दहा जुगारी गाेलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसाच्या विशेष पथकाने अचानक छापा मा रुन जुगाऱ्यांना पकडले असून, यामध्ये घरमालकासह जुगाऱ्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.