भरधाव वाहनाने हॉटेलमध्ये कामास निघालेल्या दुचाकीवरील दोघांना चिरडले

By संदीप शिंदे | Published: July 21, 2023 12:55 PM2023-07-21T12:55:37+5:302023-07-21T12:57:56+5:30

औसा तालुक्यातील उजनी मोडवरील घटना

A speeding vehicle crushed two people on a two-wheeler who were on their way to work in a hotel | भरधाव वाहनाने हॉटेलमध्ये कामास निघालेल्या दुचाकीवरील दोघांना चिरडले

भरधाव वाहनाने हॉटेलमध्ये कामास निघालेल्या दुचाकीवरील दोघांना चिरडले

googlenewsNext

उजनी (ता. औसा) : औसा-तुळजापूर महामार्गावरील उजनीमोड येथील एका हॉटेलसमोर शुक्रवारी सकाळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडाच पडल्याचे दिसत होते.

चंद्रकांत राजेंद्र नागराळे (वय २७) व सुर्यदिप दिनकर शिंदे (वय २३ दोघेही रा. टाका ता. औसा) असे मयत दोघांची नावे आहेत. भादा पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील टाका येथील चंद्रकांत नागराळे, सुर्यदिप शिंदे हे दोघे दररोज टाका येथून उजनी येथे हॉटेलमध्ये काम करण्यासाठी ये-जा करीत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामासाठी आपल्या दुचाकीवरून उजनीकडे येत होते. ते उजनीमोड येथील हॉटेल सहारासमोर पोहचले असता त्यांच्या दुचाकीस भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने उडविले. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच भादा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश सारोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, मृतदेहावर उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजपाल कदम यांनी शवविच्छेदन केले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह...
अपघातातील मयत चंद्रकांत नागराळे यांचा आठ महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी गरोदर आहेत. त्यांच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. तर सुर्यदिप शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या दोन कुटुंबांवर दुखा:चा डोंगर कोसळला असून, टाका व उजनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A speeding vehicle crushed two people on a two-wheeler who were on their way to work in a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.