भरधाव वाहनाने दुचाकींना उडविले; लातुरातील घटना, एकजण जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: November 12, 2023 06:19 AM2023-11-12T06:19:41+5:302023-11-12T06:20:43+5:30

रात्री दहा वाजताचा अंबाजाेगाई राेडवरील थरार...

A speeding vehicle overturned the two-wheeler; Incident in Latur, one injured | भरधाव वाहनाने दुचाकींना उडविले; लातुरातील घटना, एकजण जखमी

भरधाव वाहनाने दुचाकींना उडविले; लातुरातील घटना, एकजण जखमी

लातूर : भरधाव वाहनाने पार्किंगमधील दुचाकींना उडवत रस्त्यावरील एका दुचाकीला जाेराने उडविल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लातुरातील आंबाजाेगाई राेडवरील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यानजीक उतारावर घडली. हा थरार पाहून अनेकांच्या काळजाचा ठाेका चुकला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. अपघातात वाहन जाग्यावरच उलटल्याने काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. घटनास्थळी पाेलिसांनी धाव घेत उलटलेले वाहन ताब्यात घेतले असून, वाहनचालक मात्र गायब झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, असे पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकाकडून रेणापूर नाक्याकडे निघालेल्या भरधाव वाहनाने अंबाजाेगाई राेडवर रस्त्यालगत पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकींना जाेरात उडवत जीप निघाली हाेती. समाेरच उताराला काही अंतरावर रस्त्यालगत थांबलेल्या एका दुचाकीला या वाहनाने पाठीमागून जाेराने उडविले. या अपघातात दुचाकीवरील एक जखमी झाला आहे. हा थरार रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी, रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पाहिला.

भरधाव असलेले वाहन अपघातानंतर रस्त्यावरच उलटले. परिणामी, वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली हाेती. घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी जखमीला एका वाहनातून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, तर वाहनचालक हा अपघातस्थळावरून गायब झाला आहे. आता पाेलिस त्याचा शाेध घेत असून, पाेलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. जखमीच्या जबाबानंतर शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी रात्री उशिरा दिली.

Web Title: A speeding vehicle overturned the two-wheeler; Incident in Latur, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.