वाळूची वाहतूक करणारा टिप्पर नदीपात्रात काेसळला; चालक ठार, एक जखमी

By राजकुमार जोंधळे | Published: December 29, 2023 10:14 PM2023-12-29T22:14:23+5:302023-12-29T22:14:54+5:30

मन्याड नदीच्या पुलावरील घटना

A tipper transporting sand fell into a river basin; Driver killed, one injured | वाळूची वाहतूक करणारा टिप्पर नदीपात्रात काेसळला; चालक ठार, एक जखमी

वाळूची वाहतूक करणारा टिप्पर नदीपात्रात काेसळला; चालक ठार, एक जखमी

अहमदपूर (जि.लातूर) : वाळूची वाहतूक करणारा टिप्पर नदी पात्रात काेसळल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात टिप्परमध्ये असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर नांदेड रोडवर असलेल्या सुनेगाव सांगवी येथील मन्याड नदीच्या पुलावरून वाळूची वाहतूक करणारा टिप्पर (एम.एच.२६ बी. ८०८०) लोह्याकडून अहमदपूरकडे येत हाेता. दरम्यान, मन्याड नदीच्या पुलावरून ताे आल्यानंतर नदीपत्रात कोसळला. या अपघातात चालक हनुमंत रावसाहेब ढवळे (वय ३५, रा.दगडगाव ता.लोहा जि.नांदेड) हा जागीच ठार झाला, तर टिप्परमध्ये साेबत असलेला आनंद सुभाष गोडबोले (रा.जवळा ता.लोहा, जि.नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास अहमदपूर पोलिस करीत आहेत.

Web Title: A tipper transporting sand fell into a river basin; Driver killed, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.