पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झाड कोसळले; दोन तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:55 PM2022-07-13T17:55:47+5:302022-07-13T17:55:54+5:30
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहर व परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे.
- हणमंत गायकवाड
लातूर: संततधार पावसामुळे शहरातील अंबाजोगाई रोडवरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठे झाड बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोसळले. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन झाड रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहर व परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे झाडे उन-मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात झाड म्हणून पडले होते. बुधवारी शहरातील मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी अंबाजोगाई रोडवर मोठे झाड उन्मळून पडले.
दरम्यान, मनपाचे क्षत्रिय अधिकारी बंडू किसवे, कलीम शेख, रवी कांबळे, धोंडीराम सोनवणे, अजय वाघमारे, नागसेन स्वामी, दर्शन माळवदकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला केले.त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.