क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर

By राजकुमार जोंधळे | Published: January 6, 2024 07:13 AM2024-01-06T07:13:56+5:302024-01-06T07:14:18+5:30

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

a trivial cause, Killing one with a gupti one serious | क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर

क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर

लातूर : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या हाणामारीत एकाचा गुप्तीने भाेसकून खून करण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील हाेळी गावात शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील हाेळी गावात दाेन कुटुंबामध्ये शुल्लक कारणावरुन शुक्रवारी रात्री वादाला ताेंड फुटले. अचानकपणे दाेन कुटुंबामध्ये राडा सुरु झाला. यात धारधार गुप्तीने एका ४० वर्षीय व्यक्तीचा भाेसकून खून करण्यात आला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हाणामारी घटना सुरु असताना गावातील एकाने औसा ठाण्याला फाेनद्वारे याबाबतची माहिती दिली. मिळाल्यानंतर औसा उपविभागीय पाेलिस अधिकारी रामदास इंगवले, पाेलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड, सहायक पाेलिस निरीक्षक भाेवळ, सहायक पाेलिस निरीक्षक लाेंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या एकाला तातडीने एका वाहनातून लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

रात्री उशिरापर्यंत पाेलिस घटनास्थळावर ठाण मांऊन हाेते. यातील काही लाेकांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.

Web Title: a trivial cause, Killing one with a gupti one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.