सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Published: March 21, 2023 07:50 PM2023-03-21T19:50:40+5:302023-03-21T19:51:08+5:30
मृत शेतकरी परमेश्वर मुसळे यांच्यावर कुटुंबातील २० जणांच्या प्रपंचाचा भार हाेता. कुटुंबातील इतर मंडळीही रोजगार करून हातभार लावत हाेते.
किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील माेळवणवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा घडली. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. परमेश्वर एकनाथ मुसळे (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत शेतकरी परमेश्वर मुसळे यांच्यावर कुटुंबातील २० जणांच्या प्रपंचाचा भार हाेता. कुटुंबातील इतर मंडळीही रोजगार करून हातभार लावत हाेते. परमेश्वर मुसळे हेही विद्युत मोटारी दुरुस्तीचे करत होते. दरम्यान, कोरोनाकाळात आई-वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी माेठ्या प्रमाणावर खर्च झाला हाेता. त्यासाठी त्यांनी लाखाे रुपयांची रक्कम कर्ज म्हणून काढली हाेती. डाेक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? याच विंवचनेत हाेते. त्यांना एकूण सात एकर काेरडवाहू जमीन आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे स्वतःच्या शेतात सोमवारी रात्री ९ वाजता झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात तुकाराम एकनाथ मुसळे यांच्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे.