औषधाचे पैसे मागितल्याने मेडिकल स्टोअरवरील तरुणास टाेळक्याकडून जबर मारहाण

By राजकुमार जोंधळे | Published: August 29, 2022 05:30 PM2022-08-29T17:30:28+5:302022-08-29T17:30:43+5:30

लातुरातील घटना : ९ जणांविराेधात गुन्हा दाखल

A young man at a medical store was severely beaten up by a gang for asking for money for medicine | औषधाचे पैसे मागितल्याने मेडिकल स्टोअरवरील तरुणास टाेळक्याकडून जबर मारहाण

औषधाचे पैसे मागितल्याने मेडिकल स्टोअरवरील तरुणास टाेळक्याकडून जबर मारहाण

Next

लातूर : औषधींचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन दुकानदारासह अन्य एकाला टाेळक्याने जबर मारहाण करुन, दगडफेक केल्याची घटना लातुरातील शामनगर परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात एकूण ९ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, विजय अनिल रेड्डी दुंगारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ते एका मेडिकलमध्ये रात्रीपाळीला कामाला आहेत. २६ ऑगस्ट राेजी रात्री सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास दुकानासमाेर अनाेळखी सात-साठ जण आले हाेते. दरम्यान, त्यातील एकाच्या हाताच्य ापाेटरीला मार लागून ताे जखमी झाला हाेता. त्याला मलमपट्टी करण्यासाठी तक्रारदाराला टाेळक्याने सांगितले. ते आपले काम नाही, असे त्यांनी टाेळक्याला बजावले. त्यावरुन तक्रारदाराकडे वेदनाशमक गाेळी, मलमपट्टी देण्यास सांगितले. ते दिल्यानंतर त्याचे पैसे मागितले असता, त्यांनी आम्हाला ओळखत नाही का? पैसे कसे काय मागताेस? असे म्हणत दगडाने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी दुकान मालकाला माेबाईलवरुन घटनेची माहिती दिल्यानंतर ते तातडीने दुकानात आले. टाेळक्याने दुकानावर दगडफेक करत काचा फाेडून नुकसान केले. उशिवाय, ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत विजय अनिलरेड्डी दुंगारे आणि दुकान मालक अरविंद चामे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत शिवाजी नगर पाेलीस ठाण्यात विजय अनिलरेड्डी दुरंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विक्की घुटे यांच्यासह अन्य साथीदार अशा एकूण ९ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक कुदळे करत आहेत.

Web Title: A young man at a medical store was severely beaten up by a gang for asking for money for medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.