रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु

By राजकुमार जोंधळे | Published: September 14, 2022 06:02 PM2022-09-14T18:02:34+5:302022-09-14T18:03:10+5:30

लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.

A young man dies after being hit by a train; Efforts are underway to identify the body | रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु

रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु

googlenewsNext

लातूर : रेल्वेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातूर शहरातील साई रोड रेल्वे पुलानजीक बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मृत तरुणाची ओळख पटली नसून, ती पटविण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. 

पोलिसांनी सांगितले, लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या आढळून आला. दरम्यान, मृत तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. तरुणाच्या अंगात निळसर-काळसर टी-शर्ट, मळकट निळी जिन्स असे कपडे आहेत. ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणांचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. वरील वर्णनाचा कोणी तरुण गायब झाला आहे का, याचाही कसून तपास केला जात आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला जात आहे.

Web Title: A young man dies after being hit by a train; Efforts are underway to identify the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.