बँकेच्या कस्टमर केअरमधून बाेलताेय म्हणत तरुणाला एक लाखाला गंडविले
By राजकुमार जोंधळे | Published: November 18, 2022 07:08 PM2022-11-18T19:08:14+5:302022-11-18T19:08:32+5:30
मुरुड पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा
लातूर : मी एस.बी.आय. कस्टमर केअरमधून बाेलताेय अशी बतावणी करुन, एका तरुणाला ९९ हजार ९९७ रुपयांना गंडविल्याची घटना लातूर जिल्ह्यातील पारुनगर-मुरुड येथे ६ नाेव्हेंबर राेजी घडली. याबाबत मुरुड पाेलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शंकर उत्तमराव महानवर (वय ३८, पारुनगर, मुरुड ता. जि. लातूर) यांच्या माेबाइलवर एका क्रमांकावरुन फाेन आला. दरम्यान, मी एस.बी.आय. कस्टमर केअरमधून बाेल आहे. तुमची ई-सर्व्हिस एक्टिव्ह झालह आहे. ती बंद करण्यासाठी तुम्ही प्ले स्टाेअर मधून ई-डेक्स अॅप डाउनलाेड करुन ती बंद करा असे सांगितले. दरम्यान, फिर्यादीने अॅप प्ले स्टाेअरवरुन डाउनलाेड केले असता, त्यांच्या माेबाइलवर ओटीपी आला.
क्रेडिट कार्डमधून ओटीपीनुसार फिर्यादीच्या बॅक खात्यातून एकूण ९९ हजार ९९७ रुपयांची कपात झाली. अचानकपणे एवढी माेठी रक्कम कपात झाल्याने त्यांनी चाैकशी केली असता, फसवणूक झाल्याचे समाेर आले. ही घटना ६ नाेव्हेंबर राेजी घडली. याबाबत मुरुड पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन अज्ञाताविराेधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.