अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; लातूरच्या खोपेगाव शिवारातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: April 5, 2024 06:57 PM2024-04-05T18:57:35+5:302024-04-05T18:58:05+5:30
ओळख पटविण्याचा प्रयत्न; आराेपींच्या शाेधात पाेलिस पथक रवाना
लातूर : अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी खाेपेगाव शिवारातील छत्रपती चाैक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आढळून आल्याने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पाेलिस करीत आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरानजीक असलेल्या खाेपेगाव शिवारात छत्रपती चाैक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २८ वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. या माहितीनंतर पाेलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामा केल्यानंतर याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात श्रीधर वसंतराव वाघमारे (वय २६, रा. एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या माहितीवरून प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात केली. दरम्यान, उत्तरीय तपासणी केल्यानंतर डाॅक्टरांच्या माहितीवरून हा खून अल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत शुक्रवारी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक शिनगारे करीत आहेत.
ओळख पटविण्याचा प्रयत्न;आराेपींच्या शाेधात पाेलिस...
खाेपेगाव शिवारातील कव्हा राेडवर एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असून, त्याची अद्यापही ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटली, तर या गुन्ह्याचा उलगडा हाेण्याला वेळ लागणार नाही. याबाबत पाेलिस अधिक चाैकशी, अज्ञात मारेकऱ्यांचा शाेध घेत आहेत. खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे समाेर आले आहे. लवकरच या गुन्ह्यातील आराेपींना अटक करण्यात येईल.
- वैजनाथ मुंडे, पाेलिस निरीक्षक, लातूर.