६ हजार पशुधनांची आधार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:13+5:302020-12-22T04:19:13+5:30
अहमदपूर : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गंत आतापर्यंत ६ हजार ६०० पशुधनांची आधार नोंदणी करण्यात आली. त्यामुळे पशुधन चोरीस गेल्यास त्याचा ...
अहमदपूर : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गंत आतापर्यंत ६ हजार ६०० पशुधनांची आधार नोंदणी करण्यात आली. त्यामुळे पशुधन चोरीस गेल्यास त्याचा शोध घेणे सोपे होणार आहे. याशिवाय, पशुधनास लसीकरण, औषधोपचार करण्यास मदत होणार आहे.
अहमदपूर येथील पशुवैद्यकीय दवाखन्यांतर्गतच्या अहमदपूर, मरशिवणी, आनंदवाडी, काळेगाव, शेणकुड, टाकळगाव, तळेगाव, हाळणी, नांदुरा (बु.), नांदुरा (खु.), टेंभुर्णी, माळेगाव खु., थोडगा या १३ गावांमध्ये २०१२ च्या पशुगणनेनुसार गाय, म्हैस व बैल असे एकूण ७ हजार १९० जनावरे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ६०० जनावरांची आधार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ५९० पशुधनाची आधार नोंदणी लवकर होणार आहे.
आधार नोंदणीमुळे भविष्यात जनावरांची संपूर्ण माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या- खुरकुत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुधनातील लाळ्या- खुरकुत आजार नष्ट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत.
आधारवरून खरेदी- विक्री...
पशुधनाची आधार नोंदणी झाली नसल्यास नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळणार नाही. आधार नोंदणीवश्रून पशुधनाची खरेदी- विक्री होणार आहे, असे येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. एम. पठाण यांनी सांगितले. आधार क्रमांक १२ अंकी राहणार आहे.
त्यावर जनावरांचा वर्ण, जात, देशी- विदेशी, सिंग सरळ अथवा वाकडे, शेपूट गोंडा रंग अशी माहिती असणार आहे.