निलंबन रद्द करा, ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Published: September 19, 2022 03:36 PM2022-09-19T15:36:04+5:302022-09-19T15:36:13+5:30

पंचायत समिती, जिल्हा परिषदेने बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार राहणार

Abolish Suspension, Gram Sevak Sangathan protest in front of Panchayat Samiti | निलंबन रद्द करा, ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

निलंबन रद्द करा, ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

Next

लातूर : उदगीर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी एन. ए. पटवारी व ग्रामसेवक व्ही.एम. साळुंखे यांचे झालेले निलंबन हे चुकीचे आहे. ते मागे घेण्यासाठी यावे, मागणीसाठी लातूर पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी एक दिवसीय धरणे व सहकार आंदोलन सुरू आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामसेवक युनियनच्या वतीने यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. लातूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक (कंत्राटी वगळून) ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामे करतील. मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषदेने बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार राहणार आहे. संबंधित कालावधीत ग्रामपंचायतचे अभिलेखे तपासणीसाठी दाखविणार नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर करणार नाहीत. 

या आंदोलनाचा पुढील टप्पा २३ सप्टेंबर रोजी असून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी युनियनचे तालुकाध्यक्ष विष्णू भिसे, थडकर यांच्यासह ग्रामसेवकांची उपस्थिती होती. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जोरदार घोषणा देण्यात आल्या. सायंकाळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Web Title: Abolish Suspension, Gram Sevak Sangathan protest in front of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.