कार-ट्रकच्या अपघातात आईसह मुलगा, दीर अशा तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:03 PM2017-11-27T21:03:20+5:302017-11-27T21:03:36+5:30

औसा : मळणीयंत्रात साडीचा पदर अडकल्याने जखमी झालेल्या आईला उपचारासाठी लातूरला नेत असताना कार- ट्रकचा अपघात झाला.

In the accident of a car-truck, the death of three sons of the deceased, the boy, including the mother | कार-ट्रकच्या अपघातात आईसह मुलगा, दीर अशा तिघांचा मृत्यू

कार-ट्रकच्या अपघातात आईसह मुलगा, दीर अशा तिघांचा मृत्यू

Next

औसा : मळणीयंत्रात साडीचा पदर अडकल्याने जखमी झालेल्या आईला उपचारासाठी लातूरला नेत असताना कार- ट्रकचा अपघात झाला. लातूर- निलंगा मार्गावरील फत्तेपूर पाटीनजीकच्या प्रभू खडी केंद्रासमोर झालेल्या या अपघातात आईसह मुलगा, दीर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली.

उमरगा तालुक्यातील कवठा येथील व्यंकट माधवराव माने (४५) यांच्या शेतात सोमवारी दुपारी १ वा. च्या सुमारास मळणीयंत्र सुरु होते. तिथे काम करणा-या पार्वतीबाई माधवराव माने यांच्या साडीचा पदर मळणीयंत्रात गेल्याने त्यांच्या गळ्यास फास बसला. तसेच डोक्यात, पाठीत मार लागला. त्यामुळे नातेवाईकांनी जखमी पार्वतीबाई यांना उपचारासाठी किल्लारीच्या खासगी दवाखान्यात आणले. परंतु, त्या गंभीर जखमी असल्याने लातूरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

त्यानुसार खासगी कार (एमएच १२, डीएम १८८) मधून लातूरला नेण्यात येत असताना लातूर- निलंगा मार्गावरील फत्तेपूर पाटीनजीकच्या प्रभू खडी केंद्रासमोर औसाहून लामजन्याकडे जाणा-या ट्रक (एमएच ११, एम ६९५३) ने जोरदार धडक दिली. त्यात आई पार्वतीबाई माधवराव माने (७०), मुलगा व्यंकट माधवराव माने (४५) आणि दीर बब्रुवान पांडुरंग माने (४७) (सर्वजण रा.कवठा, ता.उमरगा ) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचालक गोपाळ सुरवसे (३५, रा़ कवठा, ता.उमरगा), गुरुनाथ उत्के (३७, रा़ तांबरवाडी, ता़ औसा) हे गंभीर जखमी झाले. ट्रक चालक फरार झाला आहे.

दहा दिवसांतील दुसरी घटना
लातूर- निलंगा मार्गावर आठवड्यात दुसरा अपघात झाला आहे. १८ नोव्हेंबर रोजी चलबुर्गा पाटीजवळ ट्रक व बसचा अपघात होऊन सात जणांचा बळी गेला होता.  ३० जण जखमी झाले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ट्रक -कारचा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

माने कुटुंबावर काळाचा घाला
जखमी आईला उपचारासाठी घेऊन जाताना हा अपघात झाला. त्यात आईसह मुलगा व दीराचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कवठा गावावर शोककळा पसरली आहे.

अधिका-यांची घटनास्थळाकडे धाव
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख आदींनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नेण्याकरिता मदत केली.

Web Title: In the accident of a car-truck, the death of three sons of the deceased, the boy, including the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.