Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ 

By राजकुमार जोंधळे | Published: September 19, 2022 08:33 AM2022-09-19T08:33:17+5:302022-09-19T08:33:36+5:30

Accident: काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला ट्रक लातूर-बार्शी महामार्गावरील बाेरगाव काळे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास उलटल्याची घटना घडली.

Accident: Heavy vehicle overturned on Latur-Barshi road! Damage to trucks, increase in accidents | Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ 

Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ 

googlenewsNext

- राजकुमार जोंधळे 
लातूर : काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला ट्रक लातूर-बार्शी महामार्गावरील बाेरगाव काळे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. यामध्ये ट्रकचे माेठे नुकसान झाले आहे. लातूर येथून मुरुडच्या दिशने रविवारी सायंकाळी काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला टक बाेरगाव काळे चाैकामध्ये अचानक उलटला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, रस्त्यालगत ट्रकमधील काेंबड्याच्या खाद्याचे पाेते पडलेले हाेते. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नाेंद संबंधित पाेलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. हा ट्रक कसा उलटला, याचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यामुळेही वाहनांचे अपघात हाेत असल्याचे चालकांनी सांगितले. 

'ब्लॅक स्पॉट' दूर करण्याची गरज...
लातूर ते मुरुड महामार्गावर अनेक ठिकाणी माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. अचानकपणे खड्ड्यात अवजड वाहन गेल्यानंतर चालकाला त्या वाहनाचा ताेल सांभाळणे अवघड जाते. अशावेळी वाहन उलटण्याच्या घटना घडत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या मार्गावरील ब्लॅक स्पाॅट दूर करण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्याची गरज असल्याचेही वाहन चालकांनी सांगितले.

Web Title: Accident: Heavy vehicle overturned on Latur-Barshi road! Damage to trucks, increase in accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.