कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी कृती दल समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:53+5:302021-05-19T04:19:53+5:30

या कृतीदलामध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभाग, विधि सेवा प्राधिकरण, महानगरपालिका, महिला व बाल विकास, बाल कल्याण समिती यांचा समावेश ...

Action Team Committee for the Children of Parents Who Died of Corona | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी कृती दल समिती

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी कृती दल समिती

Next

या कृतीदलामध्ये पोलीस विभाग, आरोग्य विभाग, विधि सेवा प्राधिकरण, महानगरपालिका, महिला व बाल विकास, बाल कल्याण समिती यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पालकांची व त्यांच्या ० ते १८ वयोगटातील बालकांबाबत डेडीकेटेड कोविड शासकीय व खाजगी रुग्णालयीन यंत्रणा, कोविड केअर सेंटर, स्वंयसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक, कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक, इतर असे कोणीही व्यक्ती ज्यांना कोविड १९ या आजारामुळे बालकांचे आई किंवा वडील मृत्यु झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मुलांची माहिती आहे. अशा सर्वांनी संपर्क करण्याचे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पवार यांनी केले आहे.

या ठिकाणी संपर्क साधावा...

यासाठी चाईल्डनाईन- १०९८, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, लातूर बाल कल्याण समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Action Team Committee for the Children of Parents Who Died of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.