कुपोषित बालक शोधमोहिमेत कार्यकर्त्यांना मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:59+5:302021-09-04T04:24:59+5:30
येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विस्तार अधिकारी माने, ग्रामपंचायत सदस्य शिला आचार्य, ग्रामबाल संरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर ...
येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विस्तार अधिकारी माने, ग्रामपंचायत सदस्य शिला आचार्य, ग्रामबाल संरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर गालफाडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका ए.बी. सूर्यवंशी, सिरसाट, एस.आर. बनसोडे, एस.बी. पाटील, एम.पी. जाधव, यू.एम. देशपांडे आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी बालक, किशोरी, महिलांनी कुपोषणमुक्त भारत निर्माणसाठी गावातून फेरी काढण्यात आली. यावेळी क्षीरसागर म्हणाल्या की, अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीसांचे शंभर टक्के लसीकरण हाेणे गरजेचे आहे. गर्भवती व स्तनदा मातांच्या लसीकरणासाठी शिबिर घेण्याकरिता अंगणवाडीताईंनी पुढाकार घ्यावा. ‘माझे मूल, माझी जबाबदारी’च्या अनुषंगाने गाव स्तरावर कुपोषित बालके शोधण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या, असेही त्या म्हणाल्या.
यशस्वीतेसाठी सुनिता जैन, निर्गुणा सुरवसे, पार्वती गालफाडे, भाग्यश्री कटके, सुमन महाजन, मंगल गायकवाड, कालिंदा आचार्य, लिला बोंडगे, राहुलबाई इंदापुरे, सुनिता माले, अल्का मस्के, सविता रांजणकर, अनिता बनसोडे, शीला समुखराव, कालिंदा देवपुजे, सुनीता हरिदास, सुलोचना पाटील, संगीता गुंडरे आदींनी परिश्रम घेतले.