लातूर जिल्ह्यात २९४ रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:34 AM2020-09-25T09:34:19+5:302020-09-25T09:34:48+5:30
कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी १५ हजार ५८७ वर पोहोचली असून आतापर्यंत ४५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी २९४ नव्या रुग्णांची भर पडली. तर चौघा जणांचा मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी १५ हजार ५८७ वर पोहोचली असून आतापर्यंत ४५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यातील १२ हजार ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत ३ हजार ७३ रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ३५२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १२४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. रॅपिड अँटीजन टेस्ट ८४१ जणांची घेण्यात आली. त्यात ६७१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत १२४ आणि रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये १७० असे एकूण २९४ नवे रुग्ण आढळले आहेत.