जिल्ह्यात ३९५ बाधित रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:54+5:302021-05-17T04:17:54+5:30
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर... रविवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार १३४ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात ...
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर...
रविवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार १३४ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २१, सामान्य रुग्णालय उदगीर ६, सुपर स्पेशालिटी रुग्णालय गांधी चौक लातूर १६, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर ६, ग्रामीण रुग्णालय मुरुड १, अरुण अभय औसवाल अंध विद्यालय उदगीर ४, एक हजार मुला-मुलींचे वसतीगृह १२ नंबर पाटी येथील ३१, मरशिवणी कोविड केअर सेंटर ७, दापका कोविड सेंटर ७, कृषी पी.जी. कॉलेज चाकूर १२, सामाजिक न्यायभवन लामजना २, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन २८, जळकोट कोविड सेंटर ३, समाजकल्याण वसतीगृह कव्हा रोड लातूर १५, खाजगी रुग्णालय ८ तर होमआयसोलेशनमधील ९६३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहचले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.