लातूर जिल्ह्यात ५३ नव्या रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:28+5:302020-12-04T04:58:28+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत २१२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात १९३ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत २१२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात १९३ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून, १९ पॉझिटीव्ह आले आहेत. तर रॅपीड ॲन्टीजन टेस्ट ४१५ जणांची करण्यात आली. त्यात ३८१ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून, ३४ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत १९ आणि रॅपीड ॲन्टीजन टेस्टमध्ये ३४ असे एकूण ५३ रुग्ण आढळले आहेत. अशी माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल.एस.देशमुख यांनी दिली. दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने ५९ जणांना गुरुवारी सुटी देण्यात आली. त्यात लातूर, उदगीर, अहमदपूर तालुक्यात होमआयसोलेशनमध्ये उपचार घेणार्या ४० जणांचा समावेश आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, एक हजार मुलांच्या वसतीगृहातील ४,समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ४ आणि खाजगी रुग्णालयातील ५ जणांना सूटी देण्यात आली आहे.
रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी ६०४ दिवसांवर...
रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी ६०४ दिवसांवर पोहचला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४२ टक्के आहे. तर मृत्युचे प्रमाण २.९ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट होत आहे.