आदित्य ठाकरे म्हटले 'कर्जमाफी फसली', शेतकरी म्हणाला 'साहेब माझी तर झाली'!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:07 PM2019-02-11T20:07:31+5:302019-02-12T13:23:02+5:30
आदित्य ठाकरे हे चालबुर्गा शिवारात शेतकरी कर्जमाफी योजना कशी फसली हे सांगत होते.
लातूर - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचं आदित्य ठाकरे सांगत होते. तसेच, भाजपा सरकारने अद्यापही शेतकरी कर्ममाफीची प्रक्रिया नीट न राबवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी, एका शेतकऱ्याने साहेब माझी कर्जमाफी झालीय, असं उत्तर दिल्यानं आदित्य ठाकरेंची गोची झाल्याचा पाहायला मिळालं.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातील लातूर दौऱ्यावर आले होते. या गावभेटीवेळी आदित्य ठाकरेंनी कर्जमाफी प्रभावीपणे झाली नसल्याचा आरोप भाजपवर केला. मात्र, त्याचवेळी एका शेतकऱ्याने 'साहेब, माझी कर्जमाफी झाली आहे' असे उत्तर देताच आदित्य ठाकरे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर, आपल्या वक्तव्यावर सारसारवी करत, मी राजकारण करत नाही. मला राजकाण करायचे नाही. निवडणुका येत असतात जात असतात. आम्ही जिंकू, हरू आणि पुन्हा जिंकू, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत असे म्हणत सारवासारवी केली.
आदित्य ठाकरे हे चालबुर्गा शिवारात शेतकरी कर्जमाफी योजना कशी फसली हे सांगत होते. तेव्हा त्यांच्याजवळ बसलेल्या एका शेतकऱ्याने मात्र, साहेब माझी कर्जमाफी झाली आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे आदित्य ठाकरेंची काही वेळ बोलती बंद झाल्याचे दिसले. दरम्यान, लातूरमधील बुधोडा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत आदित्य ठाकरेंच्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी 10 मिनिट संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील बुधोडा, चालबुर्गा आणि किल्लारी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पशुखाद्याचे वाटप त्यांनी केले.
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान धाराशीव जिल्ह्यातील हराळी गावातील शेताची पाहणी करुन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. pic.twitter.com/6KQoNyHkUX
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 11, 2019