सर्वशिक्षा अभियानातील ८३ कर्मचाऱ्यांचे समायोजन
By admin | Published: November 26, 2014 12:39 AM2014-11-26T00:39:06+5:302014-11-26T01:09:44+5:30
लातूर : सर्वशिक्षा अभियानांर्तगत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती व समायोजित विशेष तज्ञ असे ८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने
लातूर : सर्वशिक्षा अभियानांर्तगत कार्यरत असणारे विषय साधन व्यक्ती व समायोजित विशेष तज्ञ असे ८३ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने १ आॅक्टोबरपासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत केले आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाबुगिरी संपुष्टात आली आहे़ आता डाएटकडे गेलेल्या या तज्ज्ञांकडे शाळाभेटी व प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे़ ही बाब लक्षात घेवून केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यानुषंगाने राज्यात सध्या ३३ जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये मुबंई व उपनगरे वगळून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत़ याच संस्थात अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शिक्षा अभियानामध्ये ग्रामीण क्षेत्रात पंचायत समिती व शहरी क्षेत्रात महानगरपालिकेतंर्गत राज्यातील ४०७ गट शहर साधन केंद्रातील २,०३१ विषय साधन व्यक्तींच्या याअंतर्गत लातूर जिल्हातील ६१ विषय साधन व्यक्ती व राज्यातील विशेष तज्ञ ८१४ यातंर्गत लातूर जिल्ह्यातील विशेष तज्ञ समायोजितांची सेवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वर्ग करण्यात आली आहे़ त्यामुळे आता यासर्व ८३ कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन व भत्ते महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या कार्यालयाच्या नियमानुसार व तरतुदी नुसार होणार आहेत़
यापूर्वी या कर्मचाऱ्यांना केवळ बाबुगिरीचे काम करावे लागत होते़ ते कामे संपून आता या सार्वांना शाळाभेटी, शैक्षणिक चर्चा सत्र, प्रशिक्षण यांना उपस्थित राहण्यासाठी शैक्षणिक कामकाजाचे मासिक नियोजन करुन गट व शहरातील साधन केंद्रांतर्गत शाळांना शैक्षणिक मार्गदर्शन करुन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे विशेष प्रयत्न करणार आहेत़ (प्रतिनिधी)