प्रवेश क्षमता ४१०४० जागांची; विद्यार्थी ४०१२२ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:24+5:302021-07-23T04:13:24+5:30
लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण ...
लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार १२२ आहे. या सर्व जागांवर प्रवेश दिला तरी ९१८ जागा रिक्त राहू शकतात. शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटीचा पर्याय ठेवला असला तरी दहावीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहू शकतात. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडून २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही अकरावी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असून, एकूण चार विषयांवर प्रत्येकी २५ मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, विज्ञान भाग-१,२, गणित भाग १,२ आणि सामाजिक शास्त्रावर पर्यायी उत्तरावर प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा होणार आहे. शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न असणार आहेत. या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाने तयारी केली असून, तालुक्याच्या ठिकाणी तसेच परीक्षार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी दिलेल्या पत्त्याचा विचार करून केंद्र दिले जाणार आहेत.
सीईटी वेबसाईट हँग
सीईटी वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने ती बंद आहे. राज्य मंडळाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणार आहे. शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करावा.
चार विषयासाठी शंभर गुणांची परीक्षा
अकरावी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी २१ ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण चार विषय राहणार आहेत. इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र हे विषय आहेत. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न विचारले जातील. एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार आहे.
दहावी पास विद्यार्थी ४०१२२
अकरावीसाठी एकूण जागा ४०१२२
कला शाखा १६२००
वाणिज्य ५०४०
विज्ञान १७६४०
संयुक्त २१६०