सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:03 PM2019-11-23T18:03:03+5:302019-11-23T18:06:44+5:30

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

After the establishment of power, BJP leaders reactivate; Departing towards Mumbai | सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना

सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना

Next

लातूर : देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते पुन्हा अधिक सक्रिय झाले आहेत. पक्षादेशानुसार रविवारी दुपारी ३ वाजता भाजपची बैठक होणार आहे त्यासाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

अत्यंत वेगाने घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे भाजपचे नेते व आमदार आपापल्या मतदार संघात थांबून होते. मात्र अचानकपणे शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्याने भाजपच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यामुळे  मनपातील नाट्यमय बदलानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लातुरात थांबलेलं माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी सायंकाळी मुंबईला निघणार आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे मुंबईत पोहचले आहेत.

जनतेच्या विश्वासावर स्थापन झालेले सरकार 
जनतेचा आदेश देवाला सुद्धा माहित होता. जनतेने भाजपाला जनादेश दिला होता. हा  जनादेश आणि जनतेच्या विश्वासावर  सरकार स्थापन झाले आहे. मागच्या पाच वर्षात भाजपा सरकारने  विकासकामे हाती घेतली होती ती या नव्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांचे मी लातूर जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो . हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल याची मी खात्री देतो.
- संभाजी पाटील निलंगेकर, आमदार

Web Title: After the establishment of power, BJP leaders reactivate; Departing towards Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.