आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदासाठी डावपेच आखण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:33+5:302021-02-05T06:22:33+5:30

श्लोक माधव जोशी या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब ...

After leaving the reservation, he started plotting for the post of Sarpanch | आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदासाठी डावपेच आखण्यास सुरुवात

आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदासाठी डावपेच आखण्यास सुरुवात

Next

श्लोक माधव जोशी या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार रतन राठोड, धनेश दताळे, आदी उपस्थित होते.

तालुक्यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या ४९ व २०२२ मध्ये होणाऱ्या उर्वरित ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सर्वसाधारण महिलांसाठी २४, पुरुष २५, अनुसूचित जाती प्रवर्ग महिला ९, पुरुष १०, अनुसूचित जमाती महिला २, पुरुष १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १३, पुरुष १३ असे आरक्षण जाहीर झाले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : अंधोरी, किनगाव, कोपरा, खरबवाडी, खंडाळी, गंगाहिप्परगा, माकणी, लेंडेगाव, हडोळती.

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुष : कुमठा बु., चिखली, चोबळी, नागझरी, राळगा, वळसंगी, शिरूर ताजबंद, सांगवी, सुनेगाव, रोकडा सावरगाव, सोरा.

अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला : धसवाडी, धानोरा बु., पुरुष : रुद्धा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : आनंदवाडी, कोळवाडी, कोडगाव, गुगदळ, टेंभुर्णी, तळेगाव, तेलगाव, थोडगा, बाभळदरा, माळेगाव खु., मोळवण, येस्तार, वंजारवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष : अजनी खु., किनी कदू, केंद्रेवाडी, खानापूर, मोहगाव, गादेवाडी, गुट्टेवाडी, तीर्थ, धानोरा खु., नरवटवाडी, मावलगाव, सय्यदपूर खु., सलगरा, हासरणी.

ढाळेगाव, गुंजोटी, वायगाव, हिंगणगाव खुला

सर्वसाधारण : आंबेगाव, उमरगा को., कोकणगा, गुंजोटी, गोताळा, टाकळगाव का., ढाळेगाव, देवकरा, बोडका, ब्रह्मपुरी, मांडणी, मानखेड, मेथी, मोघा, मोहगाव, रुई, वायगाव, शिवनखेड खु., सावरगाव थोट, सुनेगाव शेंद्री, हंगरगा, हिंगणगाव, हिप्परगा को.

सर्वसाधारण महिला : उजना, उन्नी, उमरगा (येल्लादेवी), काळेगाव, चिलखा, दगडवाडी, नांदुरा खु., नांदुरा बु., नागठाणा, परचंडा, बेलूर, मुळकी, आनंदवाडी, लांजी / तांबटसांगवी, वरवटी, विळेगाव, शेनकूड, सताळा, सिंदगी खु., शिंदगी बु., सुमठाणा, हाळणी, हिप्परगा (काजळ), हिप्पळगाव.

८,९,१० रोजी सरपंचपदाची निवड

आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. आरक्षणानंतर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या हाडोळती, धानोरा, खंडाळी येथे डावपेचांना वेग आला आहे. सरपंचपदाची निवड ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Web Title: After leaving the reservation, he started plotting for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.