अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता तुरीवर करपा राेगाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:35 AM2020-12-16T04:35:03+5:302020-12-16T04:35:03+5:30

अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रामणावर नुकसान झाले. खडकाळ आणि साधारण जमिनीवरील अलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी जाेपासना केली हाेती. ...

After the loss of heavy rains, now the crisis of tax rage on the trumpet | अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता तुरीवर करपा राेगाचे संकट

अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता तुरीवर करपा राेगाचे संकट

Next

अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रामणावर नुकसान झाले. खडकाळ आणि साधारण जमिनीवरील अलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी जाेपासना केली हाेती. पाण्यामुळे सदरचे पिक बहरले हाेते. मात्र, बहरात आलेल्या तुरीवर करपा राेगाने हल्ला चढवाला. यात हे पीक पूर्णत: नाहीसे झाले आहे. तुरीचा खराटाच झाला आहे. हाता-ताेंडाशी आलेला घासच या करपा राेगाने हिरावून घेतला आहे. देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकरी या संकटासमाेर आता हतबल झाला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने पंचनामे करुन मदत करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. रब्बी पिकांचाही भरवसा नाही. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे पूर्णता नाहीसे झाले आहे. आता रबीवरच शेतकऱ्यांची मदार हाेती, तेही संकटात सापडले आहे.

निवेदनावर राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील, उपाध्यक्ष सारंगपाणी पाटील, बालाजीराव बिरादार, अर्जुन ढगे, सतीश बिरादार यांची नावे आहेत.

अनुदानापासून शेतकरी वंचित...

देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. यामध्ये तूर पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने सदर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांसह राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: After the loss of heavy rains, now the crisis of tax rage on the trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.