दहावीचा शेवटचा पेपर सुटल्यानंतर पाेहायला गेला अन् पाण्यात बुडाला
By राजकुमार जोंधळे | Published: March 26, 2023 07:09 PM2023-03-26T19:09:35+5:302023-03-26T19:09:49+5:30
माझ्या मुलाला न्याय द्यावा...
लातूर : दहावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मित्रासाेबत पाेहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समाेर आले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रविवारी या घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील माताजी नगरात राहणाऱ्या भाऊसाहेब कांबळे यांचा मुलगा आदित्य (वय १६) हा इयत्ता दहावीची परीक्षा देत हाेता. दरम्यान, शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर हाेता. पेपर दिल्यानंतर ताे घरी परतला. त्यानंतर ताे आपल्या मित्रासाेबत कातपूर राेडवर असलेल्या एका स्विमिंग पुलाकडे पाेहण्यासाठी म्हणून गेला हाेता.
दरम्यान, त्याचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारनंतर घडली. त्याच्या मृतदेहाचे लातूर येथील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत मृत आदित्य कांबळे याचे वडील भाऊसाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रविवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास लातूर ग्रामीण पाेलिस करत आहेत.
माझ्या मुलाला न्याय द्यावा...
माझा मुलगा आदित्य याने यंदा दहावीची परीक्षा दिली. दरम्यान, शनिवारी ताे शेवटचा पेपर दिल्यानंतर कातपूर राेड येथील एका स्विमिंग पूल येथे मित्रासाेबत पाेहायला गेला हाेता. त्याचा मृत्यू कसा झाला? याची चाैकशी करावी. याबाबत संबंधित स्विमिंग पूल चालकावर कारवाई करावी, माझ्या मुलाला न्याय द्यावा, अशी मागणी वडील भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकारांशी बाेलताना केली आहे.