पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Published: May 24, 2023 11:21 PM2023-05-24T23:21:01+5:302023-05-24T23:21:29+5:30

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले.

After the death of his wife, the husband also died! Incident at Holi in Latur district | पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

googlenewsNext

लातूर : बुधवारी सकाळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडले. ही घटना लातूर जिल्ह्यातील होळी (ता. औसा) येथे बुधवारी घडली.

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव (१०७) यांनाही धक्का बसला. पत्नीच्या निधनाच्या दु:खातच बुधवारी सायंकाळी ५:१४ वाजता त्यांनीही आपले प्राण सोडले. 

एकाच दिवशी अडीच तासाच्या आत पत्नीपाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडले आहे. दोघांच्याही पार्थिवावर गुरुवारी सकाळी ९ वाजता मूळगावी होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

शेवटपर्यंत त्यांनी केला पायी प्रवास...
सदाशिव जाधव यांनी शेवटपर्यंत पायी प्रवास केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन ते आपल्या बाभळगाव, शिवणी आणि खरोळा येथील मुलींकडे पायीच जात होते. वाहनाने प्रवास करणे त्यांनी कायम टाळल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.

पदरात कायम असायची भाकर!
लातूर जिल्ह्यातील बाभळगाव, शिवणी आणि खरोळा गावात मुली दिल्यानंतर त्यांनी कायम त्यांच्याकडे जाताना पदरात भाकर बांधून घेतली. बाहेरचे खाणे कायम टाळले. दोघेही घरातील भाकर बांधूनच घराबाहेर पडत असत. शेवटच्या श्वासापर्यंत व्यसनापासून दूर राहत घराबाहेरील खाणे त्यांनी टाळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: After the death of his wife, the husband also died! Incident at Holi in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर