सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन

By संदीप शिंदे | Published: September 24, 2023 04:16 PM2023-09-24T16:16:37+5:302023-09-24T16:17:53+5:30

राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेृत्वाखाली जिल्ह्यात सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

Agitation before Ausa Market Committee for Soybean Research Centre | सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन

googlenewsNext

औसा : सोयाबीनच्या उत्पादनात राज्यात अ्रगेसर असणाऱ्या लातूर जिल्ह्यातून देशातील सोयाबीनचा दर ठरविण्यात येतो. असे असतानाही राज्य सरकारने सोयाबीन संशोधन केंद्र परळीला स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला करावे, या प्रमुख मागणीसाठी औसा बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आले.

राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेृत्वाखाली जिल्ह्यात सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. यानिमित्त रविवारी औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी देत आक्रोश व्यक्त केला. यावेळी संपूर्ण आडत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

यावेळी महिला संघटक जयश्रीताई उटगे, युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, किशोर जाधव, रमेश माळी, रमेश पाटील, अभिजित जाधव, महेश सगर, विशाल क्षीरसागर, प्रवीण कोव्हाळे, विजय पवार, विलास लंगर, प्रवीण बालगीर, किशोर भोसले, सिध्देश्वर जाधव, गणेश जाधव, वैभव लंगर, वैभव मोरे, श्रीधर साळुंके, नवनाथ लवटे, महेश लंगर, केशव डांगे, शिवराज पाटील, श्रीहरी उत्के, सूर्यकांत मुसळे, धनंजय सोमवंशी, राहुल मोरे, अजित सोमवंशी, निलेश अजने, बस्वराज बर्दापूरे, दत्ता साळुंके, चंद्रकांत तळेगावे, नेताजी भोईबार, विकास काळे, सुधीर खंडागळे, शाहूराज जाधव, अनंत जगताप, विनायक कांबळे, गोपाळ साठे, मुरलीधर पाटील आदींसह आडत व्यापारी, गुमास्ता, हमाल, गाडीवान व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Agitation before Ausa Market Committee for Soybean Research Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर