लातुरात व्यापारी महासंघाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:32+5:302021-05-18T04:20:32+5:30
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून व्यापाऱ्यांनी सुरक्षित अंतर राखून आंदोलन केले. लॉकडाऊन हटवा...व्यापाऱ्यांना वाचवा... लॉकडाऊन ...
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून व्यापाऱ्यांनी सुरक्षित अंतर राखून आंदोलन केले.
लॉकडाऊन हटवा...व्यापाऱ्यांना वाचवा...
लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचवा, न्याय द्या, दुकान उघडायला परवानगी द्या, नाहीतर दुकाने ताब्यात घ्या. होश मे आओ सरकार नही तो डूब जायेगा व्यापार अशा आशयाचे फलक घेऊन व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी म्हणाले, मागच्या दोन महिन्यांपासून व्यापार बंद आहेत. त्यामुळे व्यापारी संकटात सापडला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी व्यापार सुुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु परवानगी मिळालेली नाही. अशातच पुन्हा शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत आहेत. आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांची सहनशक्ती संपलेली आहे. कर्जाचे व्याज, दुकानाचे भाडे, नोकराचा पगार, वीजबिल यासाठी पैसा खर्च करणे शक्य नाही त्यामुळे दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात भांडी असोशिएशनचे राघवेंद ईटकर, फूटवेअर असोशिएशनचे मुस्तफा शेख, स्टेशनरी असोशिएशनचे आतिष अग्रवाल, विश्वनाथ किनीकर, विशाल अग्रवाल, मनीष बंडेवार, राजधूत, विनोद गिल्डा, भारत माळवदकर, दत्तात्रय पत्रावळे, मोहन रामेगावकर, राजू डावरे, विनायक चन्नागिरे, चंद्रप्रकाश सोलंकी, जुबेद खान पठाण, अमित ईटकर, सुशील राठी, श्रीराम डागा, समीर डांगरे, आनंद खंडेलवाल, रमेश शेठ, इम्तियाज शेख, कलीम शेख, इ्रमान पटेल, तजमुल मनियार, अजहर मनियार, अरुण हमीमे, जावेद पटेल आदी व्यापारी तसेच विविध असोशिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.