गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चूल पेटवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:50+5:302021-09-04T04:24:50+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सुरज पटेल यांच्या नेतृत्वाखाली येथील चौकात चुलीवर स्वयंपाक ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सुरज पटेल यांच्या नेतृत्वाखाली येथील चौकात चुलीवर स्वयंपाक करीत आंदोलन करण्यात आले. गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य अडचणीत आहेत. त्यातच महागाई वाढली आहे. त्यामुळे गोरगरिबांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या महागाईविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मनसेचे तालुका सचिव जाकीर शेख, उपाध्यक्ष कृष्णा जाधव, अबू बकर, नजीर मुजावर, मनविसे तालुकाध्यक्ष पार्थ धुमाळ, नवाज पठाण, कैलास बाबळसुरे, दत्ता सुरवसे, तानाजी सोळंके, ओम पाटील, वामन माने, प्रदीप माने, राहुल पाटील, विकास सूर्यवंशी, सोमनाथ मेळे, विशाल चाबुकस्वार, सिद्धेश्वर कदम, जीवन कांबळे, समीर शेख, समीर बागवान, प्रशांत चाबुकस्वार, विजय पवार, विष्णू जाधव, गणेश कोकरे, दत्ता शिंगरुपे, सुरज मिरकले, निसार शेख, ज्ञानेश्वर जंगलबोणे, फय्याज शेख, अजय देवा, संतोष भरणे, अनिल मिरकले, गोपाळ बिरादार, समदानी पटेल आदी उपस्थित होते.