लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता

By संदीप शिंदे | Published: April 28, 2023 10:04 PM2023-04-28T22:04:35+5:302023-04-28T22:06:17+5:30

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे.

Agricultural Development Panel's resounding victory in Latur's market committee; One-handed rule under the leadership of Amit Deshmukh | लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता

लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता

googlenewsNext

लातूर : लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले असून, त्याची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली. रात्री ९.४५ वाजता निकाल हाती लागला असून, माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. १८ पैकी १८ जागा जिंकून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता राखण्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांना यश आले आहे. मतदारांपुढे त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा ठेवला आहे. वचनपूर्ती मतदारांना भावली त्यामुळे एकतर्फी विजय त्यांना खेचून आणता आला. जाहीरनाम्यामध्ये नवीन बाजारपेठ विकसित करण्याचा संकल्प आहे. अत्याधुनिक बाजारपेठ करण्याचे वचन मतदारांना दिले आहे. विस्तारित एमआयडीसीमध्ये भव्य बाजार समिती साकारणार असल्याचे आ. अमित देशमुख यांनी मतदारांना आश्वासन दिले आहे. त्यांची ही घोषणा मतदारांना भावली असून, सर्वच उमेदवार विजयी झाले आहे.

हे आहेत विजयी उमेदवार...

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून तुकाराम ग्यानदेव गोडसे, युवराज मोहन जाधव, आनंद धोंडीराम पवार, आनंद रामराव पाटील, लक्ष्मण रामकृष्ण पाटील, जगदीश जगजीवनराव बावणे, श्रीनिवास श्रीराम शेळके, सहकारी संस्था महिला मतदार संघातून लतिका सुभाष देशमुख, सुरेखा बळवंत पाटील विजयी झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्था इमाव मतदारसंघातून सुनील नामदेवराव पडीले, सहकारी संस्था वि.जा.भ.ज. मतदारसंघ सुभाष दशरथ घोडके, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून शिवाजी किशनराव देशमुख, अनिल सुभाष पाटील, ग्रामपंचायत अ.जा.ज. मतदारसंघात बालाजी हरिश्चंद्र वाघमारे, ग्रा.पं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून सचिन विष्णू सूर्यवंशी, व्यापारी आडते मतदारसंघातून सुधीर हरिश्चंद्र गोजमगुंडे, बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा तर हमाल व तोलारी मतदारसंघातून शिवाजी दौलतराव कांबळे हे विजयी झाले आहेत.

निवडणुकीत ९१ टक्के मतदान

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. यात ९१.९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून ३ केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. बाजार समितीसाठी ५ हजार ९८३ मतदार होते. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ६१७, दुपारी १२ पर्यंत २ हजार ३६८, दोन वाजेपर्यंत ४ हजार ४५४, तर चार वाजेपर्यंत ५ हजार ४५० मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वाधिक ९९.२५ टक्के मतदान झाले; तर सहकारी संस्था मतदारसंघात ९८.४५, व्यापारी, अडते मतदारसंघात ८६.३३, तर हमाल, तोलारी मतदारसंघात ८७.५१ टक्के मतदारांंनी मतदान केले.

Web Title: Agricultural Development Panel's resounding victory in Latur's market committee; One-handed rule under the leadership of Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.