औराद परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:15 AM2021-07-21T04:15:04+5:302021-07-21T04:15:04+5:30
औराद शहाजानीसह परिसरात रविवारी जाेरदार पाऊस झाला. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी बाहेर पडत आहे. वारंवार पडत ...
औराद शहाजानीसह परिसरात रविवारी जाेरदार पाऊस झाला. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी बाहेर पडत आहे. वारंवार पडत असलेल्या जाेरदार पावसाने तेरणा नदीवरील आठही बंधारे भरली आहेत. औराद, तगरखेडा, वांजरखेडा, हालसी या शिवारात मांजरा व तेरणा नदीचे संगम हाेतो. या संगमावर दाेन्ही नदीतील पाणी जास्त झाल्यानंतर बॅक वॉटर जास्त पसरताे. तेव्हा या बॅक वाॅटरने नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी विकास माने यांंनी दिला आहे.
औराद बंधाऱ्यातून अगाेदरच पाणी साेडण्यात आले आहे. यात शेजारील कर्नाटकमधील काेंगळी प्रकल्प भरला आहे. त्यामुळे पाणी निचरा लवकर हाेणे अवघड हाेऊ शकते. त्यातच पुन्हा जास्त पाऊस झाल्यास पाणी पातळी वाढू शकते, याचा विचार करून प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क केले आहे.