लातुरात लवकरच सर्व सोयींनीयुक्त जम्बो कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:16+5:302021-04-23T04:21:16+5:30
इलेक्ट्रिकल ऑडिट तात्काळ करून घ्यावे शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी. हेल्पलाईनचे काम अधिक प्रभावीपणे करावे. ऑक्सिजनचा वापर ...
इलेक्ट्रिकल ऑडिट तात्काळ करून घ्यावे
शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी. हेल्पलाईनचे काम अधिक प्रभावीपणे करावे. ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करावा, खाजगी रुग्णालयांनी हॉटेलशी संलग्नता करावी, रुग्णांची माहिती भरण्यासाठी एक खिडकी योजना अधिक सुलभ राबवावी. वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी. सर्वांच्या सहभागातून लसीकरणाला गती द्यावी, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, डॉ. हरिदास, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. अजय जाधव, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ.डी.एन. चिंते, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. अशोक पोतदार, डॉ. अभय कदम, डॉ. चाँद पटेल, डॉ. अशोक गाणू, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. चेतन सारडा, डॉ. दीपक गुगळे, डॉ. रमेश भराटे, डॉ. विश्रांत भारती, डॉ. मेहुल राठोड, डॉ. सोपान जटाळ, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ. संजय वारद, डॉ. रवि इरपतगिरे, डॉ. ज्योती सूळ, डॉ. अनिल राठी, डॉ. आरती झंवर, डॉ. अशोक नळेगावकर आदींची उपस्थिती होती.