लातूर जिल्हा परिषदेत सबकुछ निलंगा, अध्यक्ष-उपाध्यक्षासह आता 2 सभापतीही निलंग्याचे

By admin | Published: April 3, 2017 09:10 PM2017-04-03T21:10:29+5:302017-04-03T21:10:29+5:30

जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

All the Nilanga in Latur Zilla Parishad, now with President Vice President, two Chairmen of Nilangi | लातूर जिल्हा परिषदेत सबकुछ निलंगा, अध्यक्ष-उपाध्यक्षासह आता 2 सभापतीही निलंग्याचे

लातूर जिल्हा परिषदेत सबकुछ निलंगा, अध्यक्ष-उपाध्यक्षासह आता 2 सभापतीही निलंग्याचे

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.3 - जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अध्यक्षपदासह सभापती पदेही निलंगा तालुक्याला दिल्याने लातूर जिल्हा परिषदेवर निलंग्याचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे, महिला बालकल्याण- संगीता घुले, अर्थ व बांधकाम- प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धनच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. ५८ पैकी ३७ सदस्य भारतीय जनता पक्षाचे असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडही बिनविरोध झाली होती. सोमवारी विषय समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्या. प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडून आले. अहमदपूर तालुक्यातील हडोळती मतदारसंघातील भाजपाचे प्रकाश देशमुख यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी गटातून निवडून आलेले बाळासाहेब जाधव यांना कृषी व पशुसंवर्धन, हलगरा गटातून निवडून आलेले संजय दोरवे यांच्याकडे समाजकल्याण तर रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातून निवडून आलेल्या संगीता घुले यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. 
नूतन सभापतींचा सत्कार... 
विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते सभापती प्रकाश देशमुख, संजय दोरवे, संगीता घुले, बाळासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तिरुके म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी पक्षीय भेद विसरून विकासासाठी काम केले. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे.

Web Title: All the Nilanga in Latur Zilla Parishad, now with President Vice President, two Chairmen of Nilangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.