लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:32 PM2019-09-25T12:32:10+5:302019-09-25T12:32:10+5:30

लघु प्रकल्पांत केवळ ६़९५२ द.ल.घ.मी. साठा

All projects in Latur district dry! | लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

Next
ठळक मुद्देमांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाई

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ मि.मी. पाऊस झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ ३२५ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे तर ४६ गावांना ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे़ पावसाळा संपत आला तरी मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांत ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़५० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ आॅक्टोबर अखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात आहे़ जिल्ह्यातील रेणापूर - ०़००, तीरू  -१़९८, देवर्जन - १़७३, व्हटी - ०़२२०, साकोळ -१़६५७, तावरजा-०़००, घरणी - १़३५४, मसलगा प्रकल्पात ०़०० एवढा पाणीसाठा आहे़ मध्यम ८ आणि लघू १३२ प्रकल्पात मिळून ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ निलंगा शहरासह औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पात बऱ्यापैकी म्हणजे १३़३३२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ पावसाची वार्षिक सरासरी ८०२ आहे़ सरासरीच्या ५८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी प्रकल्प मात्र कोरडेच आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात भीषण टंचाईचे संकट आहे़ 

मांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाई
मांजरा पट्ट्यातील गाधवड, तांदुळजा, सारसा, वांजरखेडा, कानडी बोरगाव, टाकळगाव, जोडजवळा, जेवळी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे़ जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, औसा या तालुक्यामध्ये पाणीटंचाई आहे़, तर निलंगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्यामुळे या तालुक्याला तूर्त दिलासा आहे़.

Web Title: All projects in Latur district dry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.