बौध्दिक विकासातून व्यक्तीचा सर्वांगिण विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:41+5:302021-09-05T04:24:41+5:30
उदगीर : बौध्दिक संपदा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बौध्दिक विकास ही काळाची गरज आहे. त्यामुळे व्यक्तीचा सर्वांगिण विकास ...
उदगीर : बौध्दिक संपदा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बौध्दिक विकास ही काळाची गरज आहे. त्यामुळे व्यक्तीचा सर्वांगिण विकास होतो, असे मत नंदुरबार येथील प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी यांनी व्यक्त केले.
येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. सुनीता लोहारे होत्या. दुसऱ्या सत्रात गुजरातमधील भुज विद्यापीठातील इंग्रजीचे सहाय्यक प्रा. डॉ. मिलिंद सोलंकी म्हणाले, उच्च शिक्षणात संशोधनाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. संशोधन ही नवनिर्मिती असते. नवे संशोधन समाजाला नवीन अभ्यासकाला, संशोधकाला उपयुक्त ठरत असते. संशोधन हे परिश्रम, सातत्य, प्रयोग, निष्कर्षातून निर्माण होते. जेवढे संशोधन जास्त आणि दर्जेदार होते, तेवढी देशाची प्रगती होत असते.
यावेळी प्र. प्राचार्य डॉ. सुनीता लोहारे म्हणाल्या, चर्चासत्रातून विचारांची देवाणघेवाण होत असते. चर्चासत्रातून ज्ञानाची मेजवानीच अभ्यासकांना मिळत असते. नवीन संशोधन पद्धती, नवीन दृष्टीने त्या विषयाकडे कसे पाहावे, त्याची दृष्टी अभ्यासकाला मिळत असते. या चर्चासत्रात नेपाळसह २३ राज्यांतील ३६३ अभ्यासकांनी नोंदणी केली होती. प्रास्ताविक डॉ. विठ्ठल गोेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती संपाळे यांनी केले तर डॉ. एन. एस. हुनगुंद यांनी आभार मानले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी संयोजक डॉ. विठ्ठल गोरे, उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे यांनी पुढाकार घेतला.