३० वर्षांनंतर माजी विद्यार्थी रमले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:57 AM2020-12-04T04:57:28+5:302020-12-04T04:57:28+5:30

मसलगा : निलंगा तालुक्यातील गौर येथील विठ्ठलराव पाटील मेमोरिअल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात ...

Alumni play at school after 30 years | ३० वर्षांनंतर माजी विद्यार्थी रमले शाळेत

३० वर्षांनंतर माजी विद्यार्थी रमले शाळेत

Next

मसलगा : निलंगा तालुक्यातील गौर येथील विठ्ठलराव पाटील मेमोरिअल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात रमत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच आपल्या गुरुवर्यांचा सत्कार केला.

अध्यक्षस्थानी रोहित पाटील होते. यावेळी माजी प्राचार्य डॉक्टर बी.पी. शेख, सिद्रामअप्पा तडकले, राजेंद्र पाटील, ज्ञानोबा चामे यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणप्रेमी बी.के. सावंत यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी प्राचार्य बी.पी. शेख म्हणाले, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाबद्दलची मुहूर्तमेढ गौर गावामध्ये रुजविण्याचे काम बी.के. सावंत यांनी केले. आज त्यांचे विद्यार्थी देशाच्या विविध कानाकोपऱ्यांत विखुरलेले असून देशसेवा, आरोग्य, शिक्षण, उच्चशिक्षण, समाजसेवा, दळणवळण, शेतीद्योग, व्यापार आदी क्षेत्रात काम करीत आहेत.

राष्ट्रपती व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त माजी विद्यार्थी गोपाळ टोकले, बालाजी ढाकणे, बब्रुवान भोजणे, प्रा. डॉ. गणपत कारिकंटे, हरी गिरी, बबिता ठाकूर, अनिता सगर, अंगद महानोरे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील २० शिक्षकांसह आजी- माजी सैनिक, शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी बालाजी ढाकणे, बब्रुवान भोजने, संजय पवार, गोपाळ टोकले, गोपाळ तावडे, डिगंबर पवार, ग्यानदेव चामे, जयश्री चामे, हेमा गिरी, अनिता सगर, संगीता पिंड, बबिता पिंड, रोहिणी कुलकर्णी, शोभा लव्हरे, कुमार देशमुख, नारायण पवार, विनायक सावंत, अनिल घारोळे, यादवराव ठाकूर, अशोक सावंत, भरत पाटील, अण्णाराव घोडके, बापू आहेरकर, निवृत्ती कारेकंटे, सोपान कारेकंटे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक बालाजी ढाकणे, सूत्रसंचालन बबिता ठाकूर यांनी केले. आभार हरी गिरी यांनी मानले.

Web Title: Alumni play at school after 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.