बचत गटाची रक्कम परस्पर अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:12+5:302021-02-18T04:35:12+5:30
याबाबत ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एनओ सीपीएल ही संस्था महिला बचत गटास कर्ज देते .कर्ज ...
याबाबत ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एनओ सीपीएल ही संस्था महिला बचत गटास कर्ज देते .कर्ज वसुलीसाठी राजकुमार ज्ञानोबा केंद्रे रा . पिंपरी ता. उदगीर याला नेमले होते . २० मे २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० या काळात वसुलीसाठी असलेले राजकुमार केंद्रे यांनी ६० हजार ९०५ रक्कम वेगवेगळ्या गावातून महिला बचत गटाचे कर्जदार यांच्याकडून वसूल केली. परंतु ती रक्कम संस्थेत न भरता परस्पर अफरातफर केली व संस्थेच्या शाखेत येऊन इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली . अशी तक्रार फिर्यादी प्रशांत संगप्पा पट्टणशेट्टी यांनी दिल्यामुळे उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये राजकुमार ज्ञानोबा केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .