अन फरार आराेपी १३ वर्षांनंतर अडकला पाेलिसांच्या जाळ्यात !

By राजकुमार जोंधळे | Published: November 8, 2022 07:47 PM2022-11-08T19:47:45+5:302022-11-08T19:47:58+5:30

निलंगा तालुक्यातील लांबाेटा गावातून पथकाने उचलले

An absconding criminal caught after 13 years by caught | अन फरार आराेपी १३ वर्षांनंतर अडकला पाेलिसांच्या जाळ्यात !

अन फरार आराेपी १३ वर्षांनंतर अडकला पाेलिसांच्या जाळ्यात !

Next

लातूर : एका गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आराेपीला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तब्बल १३ वर्षांनंतर निलंगा तालुक्यातील लांबाेटा गावातून उचलले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं. २०० / १००९ कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल हाेता. या गुन्ह्यात शासनविरुद्ध गाैतम माेरे त्याचबराेबर आरसीसी नंबर ६६५ / २००९ डीएफ नंबर २९ / २०१५ मधील आराेपी हा निलंगा तालुक्यातील लांबाेटा या गावातील गाैतम केशव माेरे आहे. याला गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने लांबाेटा गावातून अटक करण्यात आली आहे. ताब्यात असलेला गाैतम माेरे याने २००९ मध्ये लातुरातील सुभाष चाैकात थांबविण्यात आलेली माेटारसायकल चाेरली हाेती.

याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, ताे न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर राहत नव्हता. त्यामुळे ताे फरार आराेपी हाेता. तर १३ वर्षांपासून पाेलिसांना चकवा देत फरार आराेपी लांबाेटा गावात असल्याची माहिती पाेलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याच्या लांबाेटा गावातून मुसक्या आवळल्या. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

ही कारवाई पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस हेड काॅन्स्टेबल दत्तात्रय शिंदे, रणजित शिंदे, मुळे, शेख, देशमुख यांच्या पथकाने केली.

Web Title: An absconding criminal caught after 13 years by caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.