औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

By संदीप शिंदे | Published: March 31, 2023 05:41 PM2023-03-31T17:41:02+5:302023-03-31T17:42:01+5:30

शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणे, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा घटना वारंवार होत आहेत.

An attempt to cut down a tree on Ausa road; Protest by Green Latur team wearing black masks | औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

googlenewsNext

लातूर : शहरातील औसा रोडवर आदर्श कॉलनीजवळ गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी एका मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या छाटून झाड तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच काळ्या मुखपट्टी बांधून वृक्षतोडीचा निषेध व्यक्त केला.

शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणे, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा घटना वारंवार होत आहेत. टीमचे सदस्य डॉ.भास्कर बोरगावकर यांनी वारंवार चुका करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. झाडाखाली सावलीमध्ये गाडी लावू दिली नाही, म्हणून दोन-तीन अज्ञात व्यक्तींनी रागाच्या भरात झाडांच्या सर्व फांद्या तोडल्या अशी चर्चा सुरू होती. झाड तोडण्याच्या अगोदर, फांद्या मोडण्याच्या अगोदर शेजारील सीसीटीव्ही कॅमेरा दिशा बदलण्यात आली असल्याचेही ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी सांगितले. आंदोलन टीमचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: An attempt to cut down a tree on Ausa road; Protest by Green Latur team wearing black masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.