अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले !

By राजकुमार जोंधळे | Published: September 12, 2022 05:49 PM2022-09-12T17:49:32+5:302022-09-12T17:49:58+5:30

धक्काबुकी करत ती बॅग हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला.

An attempt to grab a bag worth two and a half lakhs; Cinestyle chasing one caught! | अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले !

अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले !

Next

लातूर : हातात असलेली अडीच लाखाची बॅग हिसकावात पळ काढणाऱ्या एकाला लाेकांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडल्याची घटना लातुरातील हत्ते नगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात साेमवारी पहाटेच्या सुमारास तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी महावीर बालाजी पाेकर्णा (वय ४८ रा. नवजीवन अपार्टमेंट, हत्ते नगर, लातूर) हे घरातून अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हातात २ लाख ५० हजाराची राेकड असलेली बॅग घेवून थांबले हाेते. दरम्यान, धक्काबुकी करत ती बॅग हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्याचबराेबर, शर्टच्या खिशात असलेले दाेन हजार चाेरुन नेले.

ही घटना लातूर शहरातील हत्ते नगर येथील नवजीवन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला असता, स्थानिक लाेक धावून आले. पळ काढणाऱ्यांपैकी एकाला लाेकांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन राजेश हिरया तमाईचे याच्यासह इतर तिघा अनाेळखी व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक काेव्हाळे करत आहेत.

Web Title: An attempt to grab a bag worth two and a half lakhs; Cinestyle chasing one caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.