उदगीरात सव्वा लाखांची घरफोडी; ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: January 15, 2024 08:08 PM2024-01-15T20:08:37+5:302024-01-15T20:08:57+5:30
पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविराेधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.
उदगीर (जि. लातूर) : घर फाेडून अज्ञातांनी राेख रक्कम, साेन्याचे दागिने असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना उदगीर शहरातील नळेगाव राेडवरील एसटी काॅलनी भागात घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील नळेगाव राेडवरील एसटी कॉलनी भागात मुळेनगर येथील शिवाजी गणपतराव केळगे हे भाड्याने वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याची अंगठी, कानातील दागिने, सोन्याचे पान असा ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने ९६ हजार आणि राेख २५ हजार असा १ लाख २१ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविराेधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.