अज्ञात भरधाव वाहनाने लातुरात वृद्धाला चिरडले

By राजकुमार जोंधळे | Published: August 9, 2023 05:21 AM2023-08-09T05:21:01+5:302023-08-09T05:21:17+5:30

जहिराबाद महामार्गावर रात्री घडली घटना

An unknown speeding vehicle ran over the old man in Latur | अज्ञात भरधाव वाहनाने लातुरात वृद्धाला चिरडले

अज्ञात भरधाव वाहनाने लातुरात वृद्धाला चिरडले

googlenewsNext

लातूर : मुलीला भेटून गावाकडे पायी निघालेल्या वृद्धाला भरधाव अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास जहिराबाद-परभणी महामार्गावर लोदगा (ता. औसा) येथे घडली. यामध्ये वृद्ध जागीच ठार झाला.

औसा तालुक्यातील लोदगा येथे असलेल्या मुलीला भेटून पानचिंचोली (ता. निलंगा) गावाकडे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ७० वर्षीय कांबळे नामक वृद्ध पायी निघाले होते. दरम्यान, लोदगा ते पानचिंचोली मार्गावर अज्ञात वाहनाने या वृद्धाला चिरडले. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोदगा आणि पानचिंचोली येथील काहीजण घटनास्थळी दाखल झाले. मात्र वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची कुठलीही नोंद झाली नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल केल्याचे पानचिंचोली गावातील ग्रामस्थांनी बाेलताना सांगितले.

अन्‌ मुलीची भेट ठरली अखेरची...
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लोदगा येथील मुलीला भेटून पानचिंचोली गावाकडे निघालेल्या मयत कांबळे नामक वृद्धाची ही भेट अखेरची ठरली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते जागीच ठार झाले.

Web Title: An unknown speeding vehicle ran over the old man in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात