आमदारांच्या घरासमाेर हलगी वाजवून आंदाेलन; धनगर समाज एकवटला...
By राजकुमार जोंधळे | Published: September 22, 2024 09:47 PM2024-09-22T21:47:16+5:302024-09-22T21:47:31+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाचे ...
राजकुमार जाेंधळे / लातूर : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाचे आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला पाठिंबा म्हणून रविवारी जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील आमदारांच्या घरासमाेर हलगी वाजवून आंदाेलन केले.
आमदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. अहमदपूर-चाकूरचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीरचे आमदार क्रीडामंत्री संजय बनसाेडे, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूर शहरचे आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, निलंगा येथील आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमाेर हलगी वाजवून आंदाेलन करण्यात आले. या आमदारांशी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असता, सर्वच आमदारांनी धनगर आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी लातूर जिल्हा धनगर समाजाचे बालाजी बैकरे, शिवाजीराव खांडेकर, भिमाशंकर येणुरे, नागनाथ बाेडके, मेजर काशिनाथ नदीवाडे, रामेश्वर हाके, सुखदेव गुमनर, सुनील सुरनर, माधव सुरनर, नारायण राजुरे, नारायण काचे, बाळासाहेब बेडदे, दत्तू कामाळे, सरपंच हानुमंत लवटे, रामचंद्र चिगळे, धोंडीराम पाटील, झटींगअण्णा म्हेत्रे, नामदेव काळे, प्रदिप रकटे, राम कांबळे आदींसह समाजबांधवांचा आंदाेलनात सहभाग हाेता.