वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप
By हरी मोकाशे | Published: January 1, 2024 06:26 PM2024-01-01T18:26:59+5:302024-01-01T18:27:06+5:30
केंद्र शासनाने नवीन केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. शासन जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत रस्त्यावर वाहन चालक आपली वाहने आणणार नाहीत
किनगाव : वाहन अपघात झाल्यास चालकास दोषी धरून दहा वर्षे शिक्षा अथवा ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करणारा नवीन कायदा केंद्र शासनाने केल्याने त्याचा येथील राजीव गांधी टॅक्सी संघटना, चालक संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच सोमवारपासून बुधवारपर्यंत सर्व वाहतूक बंद ठेवून संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र शासनाने नवीन केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. शासन जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत रस्त्यावर वाहन चालक आपली वाहने आणणार नाहीत, अशा आशयाचे निवेदन येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांना देण्यात आले. निवेदनावर राजीव गांधी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नाथराव मुंढे, उपाध्यक्ष महारुद्र चापोले, नामदेव सपकाळ, चाँद शेख, दिनेश कांबळे, कलिम पठाण, मनमोहन गुट्टे, विश्वदीप वाहुळे, शेख गणी, वाघमारे, नारायण सावरगावे, गजानन रत्नपारखे, गंगाधर शिनुरे, दयानंद आचार्य, पठाण उमर, मदन केंद्रे, फजल शेख, गणेश मुंढे, अक्षय ओझा, ज्ञानोबा वनवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.