निवळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:29+5:302021-01-08T05:01:29+5:30
जिल्ह्यात १७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, सध्या १७० जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार ...
जिल्ह्यात १७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, सध्या १७० जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने बाधित रुग्णांच्या संपार्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्यांवर भर दिला जात आहे. तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांची दररोज चौकशी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शिक्षक परिषदेच्या वतीने जयंती साजरी
लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूरच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आदर्श शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास वंदना सावरीकर, कविता शिंदे, रेखा बिराजदार, अरुणा बिरादार, निलकशी पोतदार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
सुरेखा कौरवाड यांचा सत्कार
लातूर : रेणापूर तालुक्यातील राजेवाडी येथील सहशिक्षिका सुरेखा कौरवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संसदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प. शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य मंगेश सुवर्णकार, व्यंकटे, कौरवाड, कीडिले, गणेश भिंगोले आदींची उपस्थिती होती.
साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार
लातूर : जगत्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद लातूरच्या वतीने आदर्श शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्राचार्या सलिमा सय्यद, वैशाली वाघमारे, भाग्यशाली गुडे, वर्षा येलमटे, सविता राठोड, वैशाली फुले, साविजेता खंदारे यांचा समावेश आहे. यावेळी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष विवेक सौताडेकर, प्रा. सुनील नावाडे, संभाजी नवघरे, अनंत सूर्यवंशी, युवराज धविले, प्रा. मेघराज सूर्यवंशी उपस्थित होते.
वानवडा शाळेत महिला शिक्षण दिन
लातूर : औसा तालुक्यातील वानवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, काव्य गायन, निबंध, नाटिका स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षिका शोभा माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे, मीरा कुलकर्णी, रचना पुरी, ज्योती मांदळे, मंदाकिनी उकादेवडे, अनिता कुरुलकर आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.